द बंगाल फाइल्स : हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी झी5 या ओटीटीप्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. द बंगाल फाइल्स हा चित्रपट 1946 मध्ये फाळणीदरम्यान बंगालमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारावर आधारित आहे. या चित्रपटात सिमरत कौर रंधावा, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत
द फॅमिली मॅन - सीझन 3 : द फॅमिली मॅन आणि द फॅमिली मॅन - सीझन 2ने घवघवीत यश मिळवल्यानंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी द फॅमिली मॅन - सीझन 3 ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रीलिज होणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहे तर निमरत कौर, जयदीप अहलावत आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील