Palash Muchhal Propose To Smriti Mandhana : महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच बोहल्यावर चढणार

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वोत्तम प्रदर्शनामुळे तिने भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी उंची मिळवून दिली आहे.

Palash Muchhal Propose To Smriti Mandhana : महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच बोहल्यावर चढणार

1 / 7

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वोत्तम प्रदर्शनामुळे तिने भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी उंची मिळवून दिली आहे

2 / 7

महिला क्रिक्रेट संघामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. शुक्रवारी 22 नोव्हेंबर 2025 संगीतकार पलाश मुच्छलने अगदी फिल्मी अंदाजात स्मृती मानधनाला प्रपोज केलंय. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पलाशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

3 / 7

व्हिडिओमध्ये स्मृतीच्या डोळ्यांवर निळ्या रंगाचे कापड बांधलेले दिसते. पलाश तिला डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये घेऊन जातो. स्टेडियमच्या मध्यभागी पोहोचल्यावर तो तिच्या डोळ्यांवरील कापड हळूहळू काढत आणि क्षणातच स्मृतीच्या चेहऱ्यावर निखळ हास्य पाहायला मिळते

4 / 7

यानंतर पलाश फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसतो, रिंग पुढे करतो आणि स्मृतीला प्रपोज करतो. हा क्षण इतका सुंदर, इतका हृदयस्पर्शी आहे की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांनाही आनंदाश्रू यावेत. स्मृतीही भावूक होत पलाशला मिठी मारते आणि त्याला प्रपोज रिंग घालते. पुढे, दोघेही आपापल्या प्रोपोज रिंगला फ्लॉंट करतात

5 / 7

पलाशने हा संपूर्ण प्रपोजल व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, काहीच क्षणातच तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओला 43 लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहे

6 / 7

दरम्यान, स्मृतीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ''मुन्नाभाई एमबीबीएस'' मधील गाण्यावर नाचत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या शेवटी ती तिची प्रपोज रिंग फ्लॉण्ट करताना दिसते. तिच्या या व्हिडिओवरही चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे

7 / 7
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number