Sankashti Chaturthi 2025 : आजपासून बदलणार 5 राशींचं भाग्य, संकटं होणार दूर, मिळणार संपत्ती व यश

आजची विघ्नराज संकष्टी चतुर्थी संकटांचा नाश करणारी मानली जाते. उपवास, पूजा व चंद्रदर्शनाने सुख-समृद्धी लाभते. यावेळी मेष, मकर, मिथुन, कन्या व तूळ राशींना विशेष लाभ होणार असून नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक जीवनात प्रगतीची संधी मिळेल.

संकष्टी म्हणजे संकटावर विजय मिळवणारी चतुर्थी. या दिवशी उपवास केल्यास, संध्याकाळी चंद्रदर्शन करून गणपतीची आराधना केली की घरातील अडचणी कमी होतात असा विश्वास आहे. संततीप्राप्ती, आरोग्य सुधारणा, नोकरी-व्यवसायातील प्रगती आणि कौटुंबिक आनंद या सर्व बाबतीत संकष्टी व्रत फलदायी ठरते. गणेशभक्त या दिवशी मोदक, दुर्वा आणि फुले अर्पण करून विघ्नहर्त्याची कृपा मागतात.

1 / 8

यंदा ही संकष्टी पितृपक्षाच्या काळात आली असल्यामुळे तिचं फळ अधिक वृद्धिंगत होईल, असा ज्योतिषांचा अंदाज आहे. काही ग्रहांच्या संक्रमणामुळे निर्माण होणारे शुभयोग काही राशींवर सकारात्मक परिणाम घडवतील. त्यामुळे या पाच राशींना विशेष लाभ होणार आहे:

2 / 8

मेष: मेष राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल आणि नव्या संधी हाताशी येतील. कुटुंबीयांचा पाठिंबा लाभेल.

3 / 8

मकर: मकर राशीवर गणेशाची विशेष कृपा राहील. धनलाभ होईल, कुटुंबात सौहार्द निर्माण होईल. गुंतवणुकीतून चांगले फळ मिळू शकते.

4 / 8

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती होईल. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प यशस्वी ठरतील.

5 / 8

कन्या: कन्या राशीसाठी दिवस शुभ आहे. घर किंवा मालमत्ता खरेदीची संधी मिळू शकते. शासकीय अडचणी दूर होतील. नोकरीत चांगली छाप पाडता येईल.

6 / 8

तूळ: तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. पती-पत्नी एकत्रित मालमत्ता खरेदी करू शकतात. व्यवसायातील तोटा कमी होईल.

7 / 8

संकष्टी चतुर्थी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर आत्मविश्वास आणि श्रद्धेला उर्जा देणारा दिवस आहे. भक्तिभावाने उपवास करून गणेशाची प्रार्थना केली तर संकटं दूर होतात आणि जीवनात नवी आशा, नवा मार्ग खुला होतो.

8 / 8
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number