वृषभ: गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. हा गजकेसरी राजयोग वृषभ राशी असलेल्या लोकांच्या गोचर कुंडलीतील लग्नस्थानी तयार होणार आहे. त्यासोबतच, मालव्य राजयोग उत्पन्न आणि लाभस्थानी तयार होणार आहे. यादरम्यान, वृषभ राशी असलेल्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतात.
अक्षय तृतीयादिवशी वृषभ राशींच्या लोकांना नवीन कल्पनांवर काम करायला आवडेल, ज्यामुळे तुमच्या नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती होईल. यादरम्यान गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. त्यासोबतच, या कालावधीमध्ये आर्थिक योजना यशस्वी होतील. इतकंच नाही, तर वृषभ राशींच्या लोकांना कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल.
या काळात अविवाहित धनु राशींच्या लोकांसाठी लग्न जुळण्याची शक्यता आहे. तसेच, या कालावधीत विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. सोबतच, या काळात मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वादही मिटू शकतात. त्यासोबतच धनु राशीच्या लोकांचे त्यांच्या आईसोबत असलेले नाते आणखी घट्ट होईल.