क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे महागड्या वस्तू वापरत असून त्यांच्या वस्तूंची किंमत कोटींच्या घरात असल्याचा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. यावर समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यास्मिन वानखेडे म्हणाल्या, आमच्या आईने समीर आणि मला ती घड्याळो गिफ्ट दिली आहेत. सतरा वर्षापूर्वीची ती घड्याळे आहेत, असे यास्मिन वानखेडे यांनी सांगितले. तसेच समीर वानखेडे वर्षांतून एकदाच खरेदी करतात आणि तेच कपडे पूर्ण वर्षभर वापरतात. त्यांना काय खरेदी करायची आहे याची ते आधीच यादी करून ठेवतात, असे यास्मिन वानखेडे यांनी सांगितले आहे.
तसेच समीर वानखेडेंनीसुद्धा यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी महागडे कपडे वापरतो ही केवळ अफवा असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले. तसेच नवाब मलिकांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावे आणि तिथले कपड्यांचे दर माहिती करून घ्यावे. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.