FASTag वॉलेटमधून विनाकारण पैसे कट होतायेत? लगेच अशी करा तक्रार!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांने (NHAI) ने चुकीच्या टोल कापण्याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

FASTag वॉलेटमधून विनाकारण पैसे कट होतायेत? लगेच अशी करा तक्रार!

गाडी टोल नाक्यावरून गेलीच नाही तरी देखील FASTag वॉलेटमधून पैसे कट झाले? असं तुमच्यासोबत घडलयं का? असं अनेक वाहन चालकांसोबत वारंवार घडलं आहे. पण आता वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांने (NHAI) ने चुकीच्या टोल कापण्याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

NHAI ने यापुढे FASTag चुकीच्या पद्धतीने स्कॅन करणाऱ्या किंवा चुकीच्या नंबरने टोल वसूल करणाऱ्या टोल ऑपरेटरवर 1 लाख रुपयांचा दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्या टोल नाक्यावरून गेल्याशिवायही FASTag मधून पैसे वजा होत आहेत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. या तक्रारीची दखल घेत NHAI ने हा निर्णय घेतला आहे. 

नेमकं काय होतं होतं?
गाडीच्या नंबर प्लेटची चुकून नोंद होणं, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांकडून जाणूनबुजून चुकीची नोंद करणं यासारख्या बाबीमुळं ही समस्या वाढत होती. आता या गंभीरची NHAI ने दखल घेतली आहे.  

हेही वाचा –  पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; प्रत्येक गावात मिळणार 'ही' सुविधा

NHAI च्या टोल व्यवस्थापन युनिट Indian Highways Management Company Ltd ने केलेल्या कडक कारवाईमुळे अशा तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. याआधी दरमहा 200 पेक्षा जास्त चुकीच्या टोल कापल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात होत्या. पण आता त्या फक्त 50 च्या आसपास राहिल्या आहेत.

चुकीने टोल कापल्यास काय करावं?
जर तुमच्या FASTag वॉलेटमधून चुकीची टोल कटोती झाली असेल तर तुम्ही तीन पद्धतीने याची तक्रार करू शकता. यात 1033 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा falsededuction@mad.com या ईमेलवर तक्रार नोंदवा. याशिवाय आपण NHAI च्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर तुमची तक्रार मांडू शकता. तुमची तक्रार आल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि चुकीची टोल कटोती झाल्यास पैसे ग्राहकांच्या FASTag वॉलेटमध्ये परत दिले जातील. 

हेही वाचा – Jaya Kishori : जया किशोरी म्हणाल्या, 'रावण रेपिस्ट होता, ब्रह्मदेवाने दिलेल्या 'या' शापामुळे नाईलाजने त्याने सीतेला स्पर्श…' 

 

दरम्यान, NHAI च्या या नव्या नियमामुळं वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं चुकीच्या टोल वसुलीला आळा बसणार असून FASTag व्यवहार अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number