अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपूर दौरा रद्द करत कणकवलीत परतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार […]

अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपूर दौरा रद्द करत कणकवलीत परतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आज नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.

सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे. तर याप्रकरणी नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता त्यांचे वडील नारायण राणे यांनीच व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणाणी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.

नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरून जाताना भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याऊ-म्याऊ करत त्यांना डिवचलं होतं. याप्रकरणी विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुद्दा उखडून काढला. याप्रकरणी नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना नेते भास्कर जाधव आणि सुहास कांदे यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number