‘हॅप्पी लँडिंग’ ३७ वैमानिकांची

गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा हा सोहळा ठरला. नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला आहे.  कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. ३७ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर […]

‘हॅप्पी लँडिंग’ ३७ वैमानिकांची

गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा हा सोहळा ठरला. नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला आहे.  कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. ३७ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षांत सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती.

दरम्यान युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उत्कृष्ट कामगीरी साठी फ्लेजिंग ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव कऱण्यात आला आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी  एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते.

अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३७ वैमानिकांना एव्हिएशन विंग आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number