विधानसभा अध्यक्ष पदावरुन वातावरण तापणार?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे तसेच या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार? याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले […]

विधानसभा अध्यक्ष पदावरुन वातावरण तापणार?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे तसेच या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार? याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आल़े. यावेळी राज्याचे अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number