महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यास बेधम मारहाण करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. संदीप तिवारी असे या तरुणाचे नाव असून तो अंबरनाथमधील रहीवाशी आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
त्यामुळे संतप्त मनसैनिकांनी मनसेच्या कार्यालयात आणून संदीप तिवारीला उठाबश्या काढायला लावल्या तर मारहाणही केली आहे. असे प्रकार नेहमी घडत असून मनसेविरोधात पोस्ट टाकणाऱ्या कित्येक तरुणांना मारहाण करण्यात आली आहे.
यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये एका तरुणाला अशाच प्रकारे चोपले होते. पुणे, औरंगाबादेतही एकावर शाईफेक करुन बेदम मारहाण करण्यात आली होती.