Palghar Factory Wall Collapse: रबर कारखान्यात भीषण दुर्घटना; भिंत कोसळून 3 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू

वाडा तालुक्यातील पाली पोशेरी परिसरात स्थित असलेल्या 'टीना रबर' या कारखान्यात अचानक एका आवारातील भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली.

Palghar Factory Wall Collapse: रबर कारखान्यात भीषण दुर्घटना; भिंत कोसळून 3 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू
कारखान्याची भिंत खचून 3 कामगारांचा बळी

Palghar Factory Wall Collapse: पालघर जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या सुरक्षेशी खेळ सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाडा तालुक्यातील पाली पोशेरी परिसरात स्थित असलेल्या ‘टीना रबर’ या कारखान्यात अचानक एका आवारातील भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत 3 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुष कामगाराचा समावेश असून केशव गुणगुणा, रंजना कोंब व मीरा गवळी अशी त्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून कारखान्यांमधील सुरक्षेच्या उपायांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच दुसरी आपत्ती

औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांत जीर्ण तसेच कमकुवत झालेल्या बांधकामांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याचे चित्र आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथेही खेंदाड गल्लीत पहाटेच्या सुमारास जीर्ण घराची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत मीनल ठोंबरे आणि त्यांची मावशी सुमन पारदे या दोघींचा रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच वाड्यातील रबर कारखान्यात ही दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? पक्ष फोडायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत करा; दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

कामगार सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली

एमआयडीसी व इतर औद्योगिक क्षेत्रांतील कारखान्यांमध्ये कामगारांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे कायद्यानुसार बंधनकारक असते. मात्र, अनेकदा प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि कंपनी मालकांचा निष्काळजीपणा यामुळे सुरक्षिततेच्या मानकांकडे दुर्लक्ष केले जाते. टीना रबर कारखान्यातील ही भिंत आधीपासूनच जीर्ण होती का आणि तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या अपघातास जबाबदार असणाऱ्या घटकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत सर्व कारखान्यांचे सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number