‘शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच’

राज्यात जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. पंरतु आम्हाला मुंबईत येऊन दाखवाच, अशी धमकी दिली. मात्र, आम्ही शनिवारी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्याची भूमिका आ. रवी राणा आणि खा.नवनीत राणा यांनी घेतली आहे. राणा […]

‘शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच’

राज्यात जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. पंरतु आम्हाला मुंबईत येऊन दाखवाच, अशी धमकी दिली. मात्र, आम्ही शनिवारी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्याची भूमिका आ. रवी राणा आणि खा.नवनीत राणा यांनी घेतली आहे.

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार यावर राणा दाम्पत्य ठाम आहेत. तसेच आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे राणा दाम्पत्यांनी जाहीर केले आहे.

राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून मातोश्री परिसरात जाऊ नये, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे. मात्र, हनुमान चालीसाचे पठण करण्यापासून मुख्यमंत्रीही अडवू शकत नाहीत, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. त्यामुळे आम्हाला रोखण्याचं कारण नाही. आम्ही दहशतवादी नाहीत. आम्ही शस्त्र नाही तर हनुमान चालीसा घेऊन जाणार आहोत. तसेच आम्हाला आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांचा हनुमान चालीसाला विरोध का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number