मुंबई : मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. करी रोड, लोर परेल, प्रभादेवी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 1 हजार 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे कामामुळे मुंबईतील काही भागात पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी 28 नोव्हेंबरला रात्री 10 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सुमारे 22 तास जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम चालणार आहे. त्यानंतर 29 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी रात्री आठच्या पुढे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.