मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद

पाइपलाइन दुरुती आणि फलो मीटर बसवण्याच्या कामाबाबत मुंबई आणि पुण्यात काही भागातील पाणी पुरवठा हा खंडित करण्यात येणार आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी तर पुण्यात गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा खंडित आणि कमी दाबणे होणार आहे. याची दखल घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन दोन्ही महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. मुंबईत गुरुवारी आणि […]

मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद

पाइपलाइन दुरुती आणि फलो मीटर बसवण्याच्या कामाबाबत मुंबई आणि पुण्यात काही भागातील पाणी पुरवठा हा खंडित करण्यात येणार आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी तर पुण्यात गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा खंडित आणि कमी दाबणे होणार आहे. याची दखल घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन दोन्ही महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे एस आणि एन वॉर्डमधील विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा हा खंडीत करण्यात येणार आहे. यामुळे भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि घाटकोपर परिसरातील पाणीपुरवठा हा काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या सोबतच लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

गुरुवारी पुण्यातील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेने विविध भागात फ्लो मीटर बसवण्याचे काम सुरु केले. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number