मुंबईत गुरुवारी, शुक्रवारी १० टक्के पाणीकपात

मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी  तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात केली आहे.

मुंबईत गुरुवारी, शुक्रवारी १० टक्के पाणीकपात

मुंबई : वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद पडली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली. दुरूस्‍ती कामासाठी सुमारे ४८ तास इतका कालावधी अपेक्षित आहे. संपूर्ण मुंबई कार्यक्षेत्रात ५ ते १० टक्के पाणीकपात केली आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी  तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात केली आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number