शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नवी दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यावर संजय राऊत यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईची प्रतिक्षा करत असल्याचे संजय राऊत म्हटले आहेत.
संजय राऊत म्हणाले, ‘दिल्ली माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मी दिल्लीतच आहे. मला कोणतेही संरक्षण नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांना माझ्यावर कारवाई करायची असेल तर या. वाट बघतोय… मी इथेच बसलोय.’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये बोलताना भाजपाविरोधात अपशब्द वापरला. तसेच महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले. त्यामुळे याप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
मुलाखतीमध्ये वापरलेला ‘तो’ शब्द योग्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले, ‘अशिक्षित लोकांना काही कळत नाही. हे हिंदी भाषेचा आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले असता मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा असल्याचा दावा’ संजय राऊतांनी केला होता.