विदर्भाचा लखपती गणपती

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोनं चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. या मूर्तीची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे. गेल्या 12 वर्षापासून या गणेश मूर्तीवर दरवर्षी सोने आणि चांदीच्या आभूषणात वाढ करण्यात येते. याही वर्षी या गणेशमूर्तीवर 10 किलो चांदीची आभूषणं चढवण्यात आली आहेत. यावर्षी या गणेश मूर्तीवरील […]

विदर्भाचा लखपती गणपती

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोनं चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. या मूर्तीची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे.

गेल्या 12 वर्षापासून या गणेश मूर्तीवर दरवर्षी सोने आणि चांदीच्या आभूषणात वाढ करण्यात येते.

याही वर्षी या गणेशमूर्तीवर 10 किलो चांदीची आभूषणं चढवण्यात आली आहेत.

यावर्षी या गणेश मूर्तीवरील आभूषणाचा आपण विचार केला, तर तब्बल 70 किलो चांदी आणि 2 किलोच्या वर सोन्याचे अलंकार चढवलेले पाहायला मिळतायत.

यामध्ये सोनाच्या हार, कानातील कुंडल गणेश आसन तसंच उंदीर याचा समावेश आहे.

हे सर्व अलंकार मंडळाचे कार्यकर्ते स्वखर्चातून आणि आलेल्या देणगीतून चढवत असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

या मूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाकडून मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात CCTV लावण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीत हे लखपती गणराज सामील होतात खरं, पण या गणराजाचे विसर्जन मात्र करण्यात येत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number