वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेले वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांना भेटण्यास बोलवले होते. यानुसार, आज वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीस शिवतीर्थ येथे निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुण्याचे माजी […]

वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेले वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांना भेटण्यास बोलवले होते. यानुसार, आज वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीस शिवतीर्थ येथे निवासस्थानी दाखल झाले आहेत.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुण्याचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असून त्यापदी मनसेने साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली. दरम्यान, राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना भेटीचे निमंत्रण दिले. त्यांनुसार आज वसंत मोरे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे आता, राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या राजकीय भेटीनंतर त्यांच्यातील नाराजी दूर होते का? तसेच या भेटीदरम्यान काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या वक्तव्याचे काही भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, मनसेच्या अनेक मुसलमान नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी ठाकरेंच्या या वक्तव्यावर वेगळी भूमिका मांडली होती. या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या साईनाथ बाबर यांची निवड केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number