मुंबईतील लसीकरण चार दिवस बंद

  देशाने १०० कोटी लसीकरण पूर्ण करण्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच राज्यात सर्व नागरिकांनी लसीकरण घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येते. मात्र अशातच मुंबईत पुढील चार दिवस लसीकरण बंद असणार आहे. गुरुवार ते रविवार या चार दिवशी कोरोना लसीकरण बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.   मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या […]

मुंबईतील लसीकरण चार दिवस बंद

  देशाने १०० कोटी लसीकरण पूर्ण करण्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच राज्यात सर्व नागरिकांनी लसीकरण घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येते. मात्र अशातच मुंबईत पुढील चार दिवस लसीकरण बंद असणार आहे. गुरुवार ते रविवार या चार दिवशी कोरोना लसीकरण बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या केंद्रांवर गुरुवार ते रविवार या चार दिवशी मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. तसेच येत्या ८ नोव्हेंबरपासून मुंबईतील लसीकरण केद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तसेच यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  तसेच राज्यात आज १ हजार ७८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ०९५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. राज्यात सध्या १५ हजार ४८५ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ९१ हजार ४९७ कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत राज्यात ६४ लाख ५३ हजार ५८१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number