एपीएमसी भाजीपाला मार्केटला अवकाळी पावसाचा फटका

बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलशेती, फळशेती, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसाचा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटला बसला आहे. नवी मुंबईमधील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये  आज ४५० गाड्यांची आवक झाली आहे. आवक झाली असली तरी अवकाळी पावसामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा भाजीपाला विकला न गेल्यामुळे आज एपीएमसी ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून राहिला. ग्राहक नसल्याने […]

एपीएमसी भाजीपाला मार्केटला अवकाळी पावसाचा फटका

बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलशेती, फळशेती, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसाचा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटला बसला आहे.

नवी मुंबईमधील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये  आज ४५० गाड्यांची आवक झाली आहे. आवक झाली असली तरी अवकाळी पावसामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा भाजीपाला विकला न गेल्यामुळे आज एपीएमसी ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून राहिला. ग्राहक नसल्याने सर्वच माल हा एपीएमसीमध्ये पडून असून भाज्यांचे दर कोसळले आहेत. मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिल्याने भाजीपाल्याचे भाव २० टक्के खाली घसरले असून माल विकला न गेल्यामुळे याचा थेट फटका शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला असून मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून नाशिकमध्ये द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number