नवी दिल्ली : यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) चा निकाल प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. National Testing Agency (NTA) कडून निकालाबाबत संभाव्य (Tentative) तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, UGC NET चा निकाल 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा दिलेले उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाईटवरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकणार आहेत.
यूजीसी नेट डिसेंबर 2025 सत्राची परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर NTA कडून संभाव्य उत्तरे जाहीर करण्यात आली होती आणि त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना मुदतही देण्यात आली होती. आता ही अंतिम तारीख आता संपलेली असून, लवकरच अंतिम उत्तरे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
NTA ने अधिकृत X अकाउंटवर पोस्ट शेअर करत निकालाबाबत संकेत दिले आहेत. या पोस्टनुसार, UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेचा निकाल 4 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे लाखो उमेदवारांचे लक्ष आता NTA कडील अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
? UGC-NET Dec 2025 Result
?️ Exam held: 31 Dec 2025 – 07 Jan 2026
? Result expected by 04 Feb 2026
? https://t.co/BNZVjMRwz1 pic.twitter.com/wyuWIllsdR — National Testing Agency (@NTA_Exams) January 31, 2026
निकाल कसा पाहायचा?
UGC NET चा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सर्वप्रथम National Testing Agency (NTA) ची अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या UGC NET 2026 Result किंवा UGC NET Dec 2025 Result या लिंकवर क्लिक करावे. पुढील पानावर ‘Result’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा Application Number किंवा Registration Number भरावा. आवश्यक माहिती सबमिट केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल, विद्यार्थी निकालाची PDF फाइल डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवू शकतात.
UGC NET परीक्षा का महत्त्वाची?
UGC NET ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे Assistant Professor पदासाठी पात्रता तसेच Junior Research Fellowship (JRF) मिळते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा Computer Based Test (CBT) मोडमध्ये घेतली जाते. परीक्षेमध्ये दोन पेपर्स असतात आणि उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी UGC NET अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
एकूणच, UGC NET निकालाबाबतची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांनी नियमितपणे NTA च्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.