Uddhav Thackeray In Dasara Melava 2025 : ‘यंदा बिनडोक्याच्या रावणाचं दहन’; उद्धव ठाकरेंचा सरकारला अप्रत्यक्षपणे टोला

मुंबई शिवाजी पार्कात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray In Dasara Melava 2025 : ‘यंदा बिनडोक्याच्या रावणाचं दहन’; उद्धव ठाकरेंचा सरकारला अप्रत्यक्षपणे टोला

मुंबई शिवाजी पार्कात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. त्यांनी राज्यासह देशात झालेल्या घटनांचा उल्लेख करत मोदी सरकारवर सडकून टीका केली. मेळाव्याची सांगता दसऱ्यानिमित्त रावण दहनाने करण्यात आली असून यावेळी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला डोकं नसून ते का नाही, याच कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जस हे सरकार बिनडोक्याचं आहे, तसेच यंदाचा रावणही बिनडोक्याचा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाषणादरम्यान त्यांनी नमूद केले की, आज आपला दसरा मेळावा होतोय. बाकी पण काही दसरा मेळावे होत आहेत. त्याबाबत मला काही बोलायचं नाईए. पण संघाच्या मेळाव्याबाबत बोलायचं आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष झाली. मला आरएसएसचे मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारायचे आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबईची दुर्दशा झाली आहे. भाजप हा अमिबा झाला आहे. वाटेल तसा कसा पसरतोयं.. जिथे जाईल तिथे मीच. हा अमिबा पोटात गेला की पोट दुखतं. नुकताच एक सर्व्हे समोर आला, त्यात आपल्या राज्याचा मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहे. सगळी बजबजपुरी केली आहे. अधिकारी पकडे जात आहेत. पण मंत्री राजरोज भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना पकडलं जात नाही. परंतू देवेंद्र फडणवीस त्यांना समज देऊन सोडून देत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number