‘ठाकरे एन. डी. स्टुडिओ हडपू पाहात होते’

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे हे नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ हडपू पाहात होते असा गंभीर आरोप भाजपाच्या नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा एन. डी. स्टुडिओवर डोळा होता. संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपट तयार केला. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाशी […]

‘ठाकरे एन. डी. स्टुडिओ हडपू पाहात होते’

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे हे नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ हडपू पाहात होते असा गंभीर आरोप भाजपाच्या नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा एन. डी. स्टुडिओवर डोळा होता. संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपट तयार केला. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाशी संबंधित काम एन. डी. स्टुडिओ येथे झाले. पण या कामाचे पैसे निर्मात्यांकडून एन. डी. स्टुडिओ देण्यात आले आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

स्टुडिओचे मालकी हक्क मिळावे यासाठी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून नितीन देसाई यांना धमक्या दिल्या जात होत्या. या विषयावर संजय राऊत स्पष्टीकरण देणार आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक मोठे निर्णय डिनो मारियोच्या उपस्थितीत व्हायचे. काही वेळा महत्त्वाची चर्चा डिनोच्या घरात व्हायची. शासन घरात आणि मुलगा डिनोच्या घरात अशी परिस्थिती होती, असाही गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number