वसईत घरफोडी करणाऱ्यांना अटक

वसईत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या संघाने चेंबूरयेथून अटक केली आहे. वसईमधील माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत २४ जानेवारी रोजी झालेल्या लाखोंच्या घरफोडीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. नंदिनी गुहागरकर यांच्या आईच्या घरी २३ आणि २४ जानेवारी दरम्यान ८ लाख […]

वसईत घरफोडी करणाऱ्यांना अटक

वसईत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या संघाने चेंबूरयेथून अटक केली आहे. वसईमधील माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत २४ जानेवारी रोजी झालेल्या लाखोंच्या घरफोडीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नंदिनी गुहागरकर यांच्या आईच्या घरी २३ आणि २४ जानेवारी दरम्यान ८ लाख ४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण संघ आणि मध्यवर्ती संघ या दोघांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीच्या आधारे सलग चार दिवस तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. आरिफ शेख (२५) आणि साहिल ऊर्फ शाहबाज शेख (३६) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number