Tree Fall Incidents In Mumbai: मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान; 24 तासांत 400 हून अधिक झाडं कोसळली, अनेक ठिकाणी खचल्या भिंती

मुंबईत मागील 24 तासांत तब्बल 428 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या तुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Tree Fall Incidents In Mumbai: मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान; 24 तासांत 400 हून अधिक झाडं कोसळली, अनेक ठिकाणी खचल्या भिंती

Tree Fall Incidents In Mumbai: मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत मागील 24 तासांत तब्बल 428 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या तुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तडाखा पश्चिम उपनगरांना बसला असून तिथे 191 दुर्घटनांची नोंद झाली आहे, तर पूर्व उपनगरात 126 आणि मुंबई शहरात 111 ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. याशिवाय, विविध भागात 28 ठिकाणी घरे किंवा घरांच्या भिंती कोसळल्या असून 24 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांमुळे धावपळ उडाली.

नवी मुंबईतही झाडे पड सत्र; सोसायट्या आणि वाहनांचे नुकसान

पावसाचा जोर केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून नवी मुंबईतही याचा मोठा फटका बसला आहे. नवी मुंबईत काल एकाच दिवसात 70 झाडे जमिनीदोस्त झाली, तर गेल्या संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर तब्बल 175 झाडे मुळासकट उखडून पडली आहेत. यामुळे अनेक निवासी सोसायट्यांच्या आवारातील मालमत्तेचे आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा – Mumbai Rain Alert : मुसळधार पावसाचा अलर्ट! आज मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; पालिका उद्यानेही राहणार बंद

पश्चिम उपनगरात पावसाची पुन्हा एन्ट्री; सध्यातरी पाणी साचले नाही

दरम्यान, मुंबईत आज सकाळच्या सत्रात पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या 5 दिवसांत पावसाने घातलेल्या धुमाकुळानंतर आज दुपारी पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे या भागात मागील अर्ध्या तासापासून पुन्हा पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. सध्यातरी पावसाचा वेग मर्यादित असल्याने पश्चिम उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याची कोणतीही घटना समोर आलेली नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number