आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत

भाजप नेते आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ओसामा समशेर खान असे शेलारांना […]

आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत

भाजप नेते आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ओसामा समशेर खान असे शेलारांना धमकी देणाऱ्या इसमाचे नाव आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांना सहकुटुंबासह दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी शेलारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. आशिष शेलार फोन करून धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. असा तपशील आशिष शेलारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळवला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेलारांना धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपाने सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच लोकप्रतिनिधींना धमक्या येण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याबाबतचे पत्र आशिष शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number