महाराष्ट्रगीतातून हे कडवे वगळले

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे. पण, राज्यगीत म्हणून स्वीकारताना या गीताचे लघुरूप करावे लागले आहे. मंगळवारी, ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पण हे राज्यगीत तयार करताना सहा नद्यांचा […]

महाराष्ट्रगीतातून हे कडवे वगळले

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे. पण, राज्यगीत म्हणून स्वीकारताना या गीताचे लघुरूप करावे लागले आहे.

मंगळवारी, ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पण हे राज्यगीत तयार करताना सहा नद्यांचा उल्लेख असलेले कडवे वगळले गेले आहे.

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा… हे कडवे राज्यगीत बनवताना वगळले गेले आहे.

राज्यगीताचे लघुरूप का करावे लागले?

राज्यगीत दरवेळी राष्ट्रगीतानंतर वाजणार आहे त्यामुळे राज्यगीत एक मिनिटात बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक मिनिटाचे राज्यगीत करताना मूळ गीतेमधील पहिले कडवे हटवले गेले आहे. तसेच, मूळ गीतापेक्षा नवे गीत द्रुतलयीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून अधिकृतरित्या स्वीकार करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर किल्क करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number