मुंबईत दर्याला उधाण

संपूर्ण राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आले आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र […]

मुंबईत दर्याला उधाण

संपूर्ण राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आले आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांकडे न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केले आहे. महापालिकेच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत हे उधाण दुपारनंतर ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असंही आवाहन प्रशासनानं केले आहे. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहेपाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर मोठ्या प्रमाणात कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number