‘मविआ’त कुरघोडीचे राजकारण

विधानपरिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावरील काँग्रेस नेते नाना पटोले यांना हटवले आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षीय पदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा अध्यक्षपदाचा आग्रह करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार राष्ट्रवादी […]

‘मविआ’त कुरघोडीचे राजकारण

विधानपरिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावरील काँग्रेस नेते नाना पटोले यांना हटवले आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षीय पदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा अध्यक्षपदाचा आग्रह करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून अध्यक्ष पदावरून काँग्रेस अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे आणि पृथ्विराज चव्हाण यांच्या नावांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी असण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर नितीन राऊतांच्या मंत्रिपदावर नाना पेटोलेंचा डोळा असून पृथ्विराज चव्हाण आणि संग्राम थोपटे यांच्या नावाच्या प्रस्तावाबाबत नाना पटोले नाखुश असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य

विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुल्या पद्धतीने निवडणूक होण्यासाठी नियम बदलण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला असून आता मविआ सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number