राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेवर काही जणांची नियुक्ती केल्याचे पत्र समाज माध्यमात व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. मात्र, चौकशीअंती हे पत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या नावे बनावट पत्रात अशुद्ध लेखन असल्याचे समोर आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे व्हायरल झालेल्या पत्रावर अशुद्ध लेखनामुळे बनावट असल्याचे समोर आले. बनावट पत्रावर मलबार हिल हा शब्द अशुद्ध लिहिलेला आहे, हे राजभवनावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सगळ्या खोडसाळपणाचा आता खुलासा झाला आहे.
मात्र, पत्र बनावट असल्याचे उघडकीस झाले मात्र, अद्याप या प्रकरणाची कुठेही तक्रार करण्यात आलेली नाही.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती रखडलेली असतानाच हे व्हायरल पत्र आल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत सहा नावांची शिफारस केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता या पत्रावर राजभवन कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. शिफारशींचं हे पत्र बनावट असून त्यात अशुद्ध लेखन असल्याचे समोर आले आहे.