भाजपाचा काहीही संबंध नाही; भाजप नेत्यांची एकमुखी भूमिका

न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सील्वर ओक या निवासस्थानी थेट मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्याती आली. दरम्यान, भाजपचे विविध नेत्यांच्या चिथवणीमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली. मात्र, आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसल्याची एकमुखी […]

भाजपाचा काहीही संबंध नाही; भाजप नेत्यांची एकमुखी भूमिका

न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सील्वर ओक या निवासस्थानी थेट मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्याती आली. दरम्यान, भाजपचे विविध नेत्यांच्या चिथवणीमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली. मात्र, आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसल्याची एकमुखी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. तसेच नेत्यांच्या घरावर आंदोलन करणे हे अयोग्य असल्याचेही भाजपाने सांगितले आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा आता उद्रेक झाला आहे. आतापर्यंत आंदोलनात १२५ कर्मचाऱ्यांनी आपले जीव गमावले आहेत. तर न्यायालयाच्या निर्णयावर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून हा मोर्चा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणल्याचा चुकीचा कांगावा केला जात आहे. तर भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचे राजकारण होत नाही, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

‘कर्मचाऱ्यांसोबत चर्चेस तयार’ – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची तयारी दर्शवली आहे. तसेच हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा पर्याय त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. माझी आई आणि मुलगी घरात आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करू द्या. मी हात जोडून सर्वांना विनंती करते की, माझी आणि आमच्या नेत्यांची चर्चेला तयारी आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदरा सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number