गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या उला उबेरच्या संपाचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.
परंतु आजकालच्या आधुनिक युगात अश्या परिस्थित पुढे जाण्याचा योग फार कमी कंपन्याच्या नशीबात असते.अश्यातच मेरु कैब्सला ओला उबेरच्या संपाचा चांगलाच फायदा झाला असल्याचे दिसत आहे.
यामध्ये १२,००० ड्रायव्हरर्सने मेरु कैब्ससाठी काम करण्यासाठी पसंती दिली असुन ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला उबेरच्या ड्रायव्हरर्सचा समावेश आहे. तसेच
ओला उबेरच्या संपापूर्वी मेरुच्या मुंबईमध्ये केवळ 2000 कैब्स होते तर आता ड्रायव्हर्सची संख्या 14,000 पर्यंत पोहोचली आहे.त्यामुळे ओला उबेरच्या संपाचा फायदा मेरु कैब्सला झाल्याचे पाहायला मिळत आहे.