Thane to Navi Mumbai Elevated Road: ठाणे ते नवी मुंबई एलिव्हेटेड रोडला मंजुरी, प्रवास फक्त 45 मिनिटात करता येणार

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत (एलिव्हेटेड) रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

Thane to Navi Mumbai Elevated Road: ठाणे ते नवी मुंबई एलिव्हेटेड रोडला मंजुरी, प्रवास फक्त 45 मिनिटात करता येणार

मुंबई: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत (एलिव्हेटेड) रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. सिडकोने तयार केलेल्या या प्रस्तावानुसार, ठाणे ते विमानतळादरम्यान सुमारे 26 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचा प्रवास केवळ 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

सध्या ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी ठाणे-बेलापूर रोड आणि पाम बीच रोड हे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. शिवाय, मुंबईतील अटल सेतू थेट नवी मुंबईशी जोडलेला असला तरी त्याला ठाण्याशी थेट जोडणारा मार्ग नाही. यामुळे ठाणे आणि नवी मुंबई या भागातील कनेक्टिव्हिटी वाढवणे आवश्यक झाले होते. याच उद्देशाने एलिव्हेटेड रोडची संकल्पना पुढे आली आणि आता त्याला मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा: Kaun Banega Crorepati : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोराची कमाल, लाईफलाईनच्या मदतीशिवाय KBC मध्ये जिंकले 50 लाख

एलिव्हेटेड रोडचा मार्ग आणि रचना कशी असेल? 
हा एलिव्हेटेड रोडचा मार्ग ठाण्यातील पटणी मैदानापासून (धन निरंकारी चौक) सुरू होणार आहे. यानंतर हा मार्ग ठाणे-बेलापूर रोडला समांतर 17 किलोमीटरचा प्रवास करत वाशीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर वाशी ते नवी मुंबई विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरचा भाग दुमजली एलिव्हेटेड रस्त्याच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

अंदाजे खर्च आणि फायदे 
या प्रकल्पासाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे फक्त प्रवासाचा वेळच नव्हे, तर इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. तसेच यामुळे औद्योगिक क्षेत्रांनाही जलद व सुलभ दळणवळणाचा फायदा मिळणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number