शिक्षक पात्रता परीक्षा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र परीक्षार्थींनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ३० सप्टेंबर पर्यंत असून २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा पहिला पेपर १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत होईल तर दुसरा पेपर १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number