मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या त्यांच्या चौकशीला ९ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच त्यांच्या अटकेच्या कारवाईवरील स्थगितीही कायम ठेवण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, परमबीर सिंग यांच्याविरोधातील चौकशी राज्य पोलिसांनी नव्हे तर इतर तपास यंत्रणेने करावी असे दिसत आहे. तसेच पोलीस चौकशी सुरू ठेवू शकतात, पण त्यांना आरोपपत्र दाखल करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
परमबीर सिंह यांना अटक न करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आज संपणार होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना दिलास दिला असून ९ मार्चपर्यंत मुंबई पोलिसांच्या चौकशीला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांच्या अटकेच्या कारवाईवरील स्थगितीही कायम ठेवण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यावर हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.