दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येबाबत केंद्रीय नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. याबाबत त्यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केली. याची दखल घेत, चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. तसेच दिशा सालियनची बदनामी थांबवण्याची मागणी सालियन कुटुंबियांनी केली आहे.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. दिशा सालियन या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. दिशाच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.’
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6 — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियनची हत्या झाली असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दिशा सालियनची बदनामी थांबवावी अशी मागणी सालियन कुटुंबाने केली आहे. तसेच दिशा सालियन यांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.