बाराशिवच्या मारुती यात्रेला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील बारा गावांच्या वेशीवर असलेल्या बाराशिव मारुती मंदिरामध्ये प्रसिद्ध जत्रा भरते आणि जवळपास ४०० वर्षांपासून भरणारी ही यात्रा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आणि जुनी यात्रा आहे. या मारुतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे १२ गावांचा कुलदैवत आहे. बाराशीव मंदीरात भगवे झेंडे बांधन्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे माघ पौर्णिमेपासून ही यात्रा सुरु होते. या यात्रेत […]

बाराशिवच्या मारुती यात्रेला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील बारा गावांच्या वेशीवर असलेल्या बाराशिव मारुती मंदिरामध्ये प्रसिद्ध जत्रा भरते आणि जवळपास ४०० वर्षांपासून भरणारी ही यात्रा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आणि जुनी यात्रा आहे. या मारुतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे १२ गावांचा कुलदैवत आहे. बाराशीव मंदीरात भगवे झेंडे बांधन्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे माघ पौर्णिमेपासून ही यात्रा सुरु होते. या यात्रेत जवळपास चार लाख भावीक भक्त दर्शन घेतात. या यात्रेत नवसाची गाडीओढ होते. तसेच ११,२१,७ दिवसांचा उपवास करणारे भाविक मंदीर परिसरात येऊन त्यांचा उपवास सोडतात.

बाराशिव हनुमाचे मंदिर बारा गावांच्या शिवेवर आहे. त्यामुळे या मंदिरास बाराशिव असे नाव देण्यात आले आहे. या मंदिराला करंजाळा, बोरी सावंत, गुंडा, रांजाळा, आजरसोंडा, जवळा बाजार, करंजी, विरेगाव, परळी, कळंबा, तपोवन, आडगाव या गावांच्या शिव लागून आहेत. हिंगोली ते परभणी राज्य मार्गावर हे मंदिर असल्याने भाविकांची येथे दररोज गर्दी असते. वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात.

बाराशिव येथे हिंगोली ते परभणी राज्य मार्गावर असललेल्या हनुमानाचे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. परजिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number