एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबई पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कर्मचाऱ्यांनी मुंबई महापालिकेसमर ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणींवर दुर्लक्ष करत आहे. तसेच एसटी […]

एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबई पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कर्मचाऱ्यांनी मुंबई महापालिकेसमर ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणींवर दुर्लक्ष करत आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी आज आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांना अंघोळ, शोचालयाची गैरसोय होत असल्याने आंदोलन सुरू आहे.

एसटी कर्मचारी मुंबई महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनात अनेक महिला कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number