किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

‘विकांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच सोमवारी १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही सोमय्यांना दिले आहेत. आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजप नेते […]

किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

‘विकांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच सोमवारी १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही सोमय्यांना दिले आहेत.

आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी सोमय्या पिता-पुत्रांनी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number