क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या रडारवर आहे. मात्र अखेर आर्यनचा जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला असून आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत.
आर्यन खानच्या एनसीबीच्या तपास रचनेत आता बदल करण्यात आले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण चौकशी आता दिल्लीत स्थानांतरित झाले आहे. आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणासह समीर वानखेडे यांच्याकडून ६ प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी समीर वानखेडे यांना या तपासातून काढण्यात आले असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे. समीर वानखेडे यांच्याकडील २६ प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे.