मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :अभिनेत्री श्वेता तिवारी हि अनेकदा समाज माध्यमानवर सक्रिय राहत असते. श्वेता तिच्या अभिनया सोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. श्वेताचे दोन लग्न झाली असून ती दोन्ही लग्न अयसश्वी ठरली असून तिला मुलगा आणि मुलगी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. तर श्वेताची मुलगी पलक हिने किसी का भाई किसी कि जान या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पलकने श्वेताच्या दुसऱ्या प्रेग्नसी बद्दल खुलासा केला.
ती म्हणाली, “मला आठवतंय मी तेव्हा 15 वर्षांचे होते. माझ्या आईने मला सांगितलं की ती आणखी एका मुलाला जन्म देणार आहे. हे ऐकून मी हैराण झाले होते. हे असं झालं होतं की आई आणि माझ्यात एखादं कॉन्ट्रक्ट आहे आणि त्यात मला धोका मिळाला आहे. माझ्या कॉन्ट्रक्टमध्ये अशा कोणत्या टर्म्सच नव्हत्या. मी गोष्ट स्वीकारूच शकत नव्हते. पण आईने माझ्या या वागण्यावर व्हाट डू मीन नो”, अशी प्रतिक्रिया दिली होती.
पलक पुढे म्हणाली, “माझी आई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की, तू कसला विचार करतेय. तेव्हा मी तिला म्हणाले की, मला कोणीच सांगितलं नाही की या घरात आणखी एक बाळ येणार आहे. मी अजून या गोष्टीसाठी तयार नाहीये. त्यावर माझ्या आईनं मला, ओव्हररिएक्ट करण बंद कर असं सांगितलं”.त्यानंतर पलक म्हणाली की मी आई सोबत सोनोग्राफीला जायचं ठरवलं मी जेव्हा आईसोबत गेली तेव्हा मी बाळाचा चेहरा पहिल्यांदा पहिला अंडी त्यावेळी मी इतकी आनंदी झाले की मी त्याच वेळी भरपूर रडायला लागले.तेव्हा पासून मी माझ्या भावावर प्रचंड प्रेम करायला लागली.