आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे का? असा सवाल उपस्थित करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या केल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अधिकार देता येणार नाही. त्याआधी त्यांना मुख्यमंत्री करावे लागेल तसेच रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला हरकत नसून त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरे यांच्या मनात आले तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करू शकतात,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
तसेच अध्यक्षविना विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांविना सरकार सुरू असल्याचा घणाघात सुधीर मुनगंटीवर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तर चंद्रकांत पाटील म्हणाले, हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आरक्षण, महिला अत्याचार या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे.