विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला. यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत मला फुकटच्या सल्ल्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजपला माझी भीती वाटत असून भीतीपोटी अशी विधानं करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाणांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, नाही तर पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला.
विनोद तावडे यांनी दिलेल्या सल्ल्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मला फुकटच्या सल्ल्याची गरज नसून तुमच्या पक्षातील इच्छुकांना हा सल्ला द्या.
तसेच अनेकांच्या कोपराला तुम्ही गुळ लावून ठेवला असून बंडखोरी होणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहे.
भाजपाला माझी भीती वाटत असून भीती पोटी असे विधान करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये नाही तर लोकसभेची पुनारवृत्ती होणार असल्याचे असा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.