मुंबईमधील दहिसर पश्चिम येथील एसबीआय बॅंकेच्या शाखेत लुटरूंकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दहिसर पश्चिम येथील गुरुकुल बिल्डिंग जीएस रोड येथे अलेलेल्या एसबीआय बॅंकेवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
दुपारी चारच्या सुमारास दहिसरच्या गुरुकुल इमारतीतील एसबीआय बॅंकेत ही घटना घडताक्षणी एमएचबी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असून या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.