शिवसेनेचीही अयोध्या दौऱ्याची तयारी

मनसेच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता शिवसेनाही अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आज शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मनसे […]

शिवसेनेचीही अयोध्या दौऱ्याची तयारी

मनसेच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता शिवसेनाही अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आज शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंग्या उतरवण्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. तसेच राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत हिंदुत्वाबाबतची रणनीती आखली आहे. दरम्यान, शिवसेनेनीही हिंदुत्व सोडले नसल्याचे आता ते दाखवून देत आहे. याच पार्श्वभूमीवर, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठिकत आदित्य ठाकरे यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत बैठक होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number