हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांवरील अत्याचारांविरोधात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हे शक्ती कायदा विधेयक मंजूर झाल्याचे सांगितले.
आंध्र प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर कठोर शिक्षेची तरतूद असलेला हा शक्ती कायदा आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या कायद्याची घोषणा केली होती. तसेच मागील अर्थसंकल्पाच्या अधिवेशनातही हे विधेयक मांडण्यात आले होते. मात्र यंदाचे सुरू असलेले हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. तर विरोधकांकडून शक्ती विधेयकाचे स्वागत करण्यात आले आहे.
शक्ती कायद्यांतर्गत महिलेवरील लैंगित अत्याचार, सामुहिक बलात्कार, विनयभंग करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हा घडल्यानंतर महिन्याभरातच महिला अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यात येणार आहेत.