येतं नववर्ष सुट्ट्यांचं, पाहा किती आहेत सुट्ट्या

अवघ्या काही दिवसात नववर्ष म्हणजे 2020 वर्ष उजाडणार आहे. नववर्षात किती सुट्ट्या असणार याबद्दल कर्मचारी वर्गात चर्चा असतेच. या बातमीतून आपण 2020 वर्षात किती सुट्ट्या असणार, हे जाणून घेणार आहोत. 2020 वर्ष हे सुट्ट्याचं वर्ष असे म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही. नववर्षात म्हणजेच 2020 या वर्षात एकूण 90 दिवस म्हणजेच 3 महिने सुट्टी असणार आहे. […]

येतं नववर्ष सुट्ट्यांचं, पाहा किती आहेत सुट्ट्या

अवघ्या काही दिवसात नववर्ष म्हणजे 2020 वर्ष उजाडणार आहे. नववर्षात किती सुट्ट्या असणार याबद्दल कर्मचारी वर्गात चर्चा असतेच. या बातमीतून आपण 2020 वर्षात किती सुट्ट्या असणार, हे जाणून घेणार आहोत.

2020 वर्ष हे सुट्ट्याचं वर्ष असे म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही. नववर्षात म्हणजेच 2020 या वर्षात एकूण 90 दिवस म्हणजेच 3 महिने सुट्टी असणार आहे.

2020 या वर्षात एकूण 52 रविवार असणार आहेत. त्यामुळे साहजिकपणे हक्काच्या 52 सुट्ट्या. तसेच 2020 वर्षासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 24 सार्वजनिक सुट्टयांची घोषणा केली आहे.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या 5 आणि दिवाळीच्या सुट्ट्या धरुन एकूण म्हणजेच 90 दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे 2020 हे वर्ष सुट्ट्यांच वर्ष असणार आहे.

नववर्षात 90 सुट्ट्या असल्या तरी काही सुट्ट्या या रविवारी आल्याने हक्कांच्या सुट्टयावर पाणी फिरले आहे.

प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष, मोहरम, दसरा या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असते. मात्र 2020 या वर्षात हे सण रविवारी आले आहेत. रविवार आल्याने या 4 सुट्ट्या वाया गेल्या आहे.

तसेच बकरी ईद , स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे सण शनिवारी आले आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे.

साधारणपणे बहुराष्ट्रीय कंपनीतील आणि इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना शनिवारी सुट्टी असते.

2020 मधील सार्वजनिक सुट्ट्या

शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी

महाशिवरात्री – 21 फेब्रुवारी

धूलिवंदन – 10 मार्च

गुढीपाडवा – 25 मार्च

रामनवमी – 2 एप्रिल

महावीर जयंती – 06 एप्रिल

गुड फ्रायडे – 10 एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल

महाराष्ट्र दिन – 1 मे

बुद्धपौर्णिमा – 07 मे

रमझान ईद – 25 मे

बकरी ईद – 01 ऑगस्ट

स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट

गणेश चतुर्थी -22 ऑगस्ट

गांधी जयंती – 2 ऑक्टोबर

ईद-ए-मिलाद – 30 ऑक्टोबर

दिवाळी – 14 नोव्हेंबर

भाऊबीज – 16 नोव्हेंबर

गुरुनानक जयंती – 30 नोव्हेंबर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number