मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ही सर्वांच्या लक्षात आहे. या मालिकेत अर्चना म्हणून अभिनेत्री अंकित लोखंडे आणि मानव म्हणून सुशांत सिंह राजपूत यांनी फार कमी वेळात प्रसिद्धी मिळवली होती. ही मालिका 2014 रोजी ऑफ एअर गेली होती. त्यानंतर या मालिकेमुळे अंकित आणि सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मात्र आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका नवीन स्वरूपात असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या मालिकेविषयी खूप उत्साह पाहायला मिळत आहे. या मालिकेत सुशांत सिंह राजपूत या मालिकेत मानव हे पात्र साकारत होता. सुशांत आणि अंकिताची जोडी या मालिकेत अतिशय लोकप्रिय होती. आता ही मालिका डिजिटल रुपात पाहायला मिळणार आहे.
अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारणार आहे. मात्र सुशांत सिंह राजपूत साकारत असलेलं पात्र हे ‘मानव’चं होतं. या पात्रासाठी शोध सुरू आहे. सुशांतची जागा कोण घेणार यावर खुलासा हा ह्याचा आहे. पवित्र रिस्ता या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘सविता ताई’ ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारली होती. मात्र उषा नाडकर्णी या डिजिटल वर्जनमध्ये सहभागी होणार नाही. असं पिंकविलाच्या मुलाखतीत माहिती दिली आहे. कोरोनाचा धोका पाहता तसेच त्यांना शुगरचा त्रास असल्यानं शिवाय त्यांचं वय 72 वर्षांचं आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. या मालिकेत उषा नाडकर्णी नसणार तसेच उषाताई या मराठी बिग बॉसमध्येही होत्या. त्यानंतर त्यांना हिंदी बिग बॉसमध्ये 15 दिवसांकरता बोलावलं होतं. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांच्या मुलाने त्यांना यामध्ये सहभाग घेण्यास नकार दिला होता.