समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादनशुल्क विभागात बदली

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला. त्यामुळे आता समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली झाली आहे. समीर वानखेडे यांना मागील वर्षी ऑगस्ट २०२१पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबर २०२१पर्यंत त्यांच्या मुदतीत वाढ केली. मात्र आता समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ पूर्ण झाला असून […]

समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादनशुल्क विभागात बदली

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला. त्यामुळे आता समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली झाली आहे.

समीर वानखेडे यांना मागील वर्षी ऑगस्ट २०२१पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबर २०२१पर्यंत त्यांच्या मुदतीत वाढ केली. मात्र आता समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली करण्यात आली आहे.

क्रुझवरील आर्यन खान ड्रग्जप्रकरणी तसेच मुंबईतील अनेक ड्रग्जप्रकरण उघडकीस आणण्यास समीर वानखेडे यांनी कारवाई केली. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खानच्या अटकेप्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत. तर वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोपही मलिकांनी केला. मात्र समीर वानखेडेकडून ड्रग्ज कारवाई सुरू होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number