एसटी संपकाऱ्यांची भूमिका गुरुवारी ठरणार

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच न्यायालयच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर एसटी महामंडळ विलिनीकरण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात येईल. तोवर एसटी महामंडळ विलिनीकरण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.   पत्रकार परिषदेमध्ये […]

एसटी संपकाऱ्यांची भूमिका गुरुवारी ठरणार

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच न्यायालयच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर एसटी महामंडळ विलिनीकरण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात येईल. तोवर एसटी महामंडळ विलिनीकरण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.

  पत्रकार परिषदेमध्ये एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेणार का?, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, सरकारने दिलेला निर्णय एसटी कर्मचाऱ्यांसमोर मांडणार आहोत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील माहिती देऊ, असे ते म्हणाले.

  सरकारच्यावतीने, परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांची बाजू मांडली आहे. राज्य सरकारने दिलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबतचा निर्णय आम्ही आता आझाद मैदानात जाऊन आंदोलक कर्मचाऱ्यांसमोर मांडू. कर्मचाऱ्यांशी चर्चा करू आणि संपाचा पुढील निर्णय जाहीर करू, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

  संपकारी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आता न्यायालयात पोहचली आहे. त्यासाठी न्यायालयाने यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे समितीच्या निर्णयानंतर राज्यसरकार त्या निर्णयाचा विचार करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तोवर कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय सरकारने दिला आहे. याबबत आम्ही आता एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू. यावर कर्मचारी जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number